श्री स्वामी समर्थ आणि अवतार श्री स्वामी समर्थांना आठवले कि सर्वप्रथम त्यांची एक प्रतिमा आपल्यासमोर पद्मासन सदृश स्थितीत बसलेले पण ध्यानात नाही, विशाल कपाळ , चेहऱ्याचा भाव कठोर, उघडबंब,कोपिनधारी , गळ्यात रुद्राक्ष, उजव्या हातात गोटी असलेले, त्यांना पाहणाऱ्याकडेच त्यांचा रोख असावा अशी भेदक नजर ,अत्यंत कर्मठ वाटणारे " श्री स्वामी समर्थ ". दुसरी ओळख म्हणजे ते दत्तावतार आहेत म्हणजेच ते श्री दत्तगुरूंचे दत्तात्रयांचे तिसरे अवतार. पहिले श्रीपाद वल्लभ , दुसरे नृसिंहसरस्वती व तिसरे श्री स्वामी समर्थ अशी दत्त संप्रदाय किंवा दत्तगुरूंची भक्ती करणाऱ्या भक्तांची धारणा आहे आणि श्रद्धाही आहे, हे कळताच मग कुतूहल अजून वाढले. मग "अवतार म्हणजे नेमकं काय ?' इथून सुरुवात करणं गरजेचं आहे . अवतार म्हणजे अगदीच सोप्या भाषेत उदाहरण द्यायचं किंवा सांगायचं झालं तर दही हा दुधाचा अवतार त्याचप्रमाणे ताक, लोणी, तूप हेही दुधाचेच अवतार. दुधाचा आत्मा मूळ आहे तर शरीर वेग...